Sunday, June 17, 2012

Party n funny jokes::

Party n funny jokes::


Fathers Day special wishes 17 June 2012

Posted: 16 Jun 2012 11:52 PM PDT

Dear Jokes-adda readers आज "जागतिक फादर्स डे" आहे, today 17th June 2012 is Fathers day, so here are some nice quotes and messages for your father.


तो बाप असतो............
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
......................तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...........................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
.......................तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.

वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण
करा.............आणि वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या