Sunday, July 15, 2012

Party n funny jokes::

Party n funny jokes::


Gatari Amavasya Wishes

Posted: 14 Jul 2012 11:32 PM PDT

Gatari ale re poranooo,

click following links for gatari wishes, sms, messages and quotes.

Gatari Amavasya wishes, sms and messages
Read wonderful story of Gatari Amavasya


Ani ho,
oku naka,
maku naka,
matnavar jasta tav maru naka,
fukat milali tar dhosu naka,
Disel tya gatarat lolu naka :)

happy gatari to all jokes-adda readers.


gatari sms wishes messages


Gatari special Kavita

दरपार्टीच्याशेवटी एक क्वार्टरकमी पडते
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचाकार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते…

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम'पारो की दारु'
याचा मला अजून संशय आहे

प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते…
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD.केल्यासारखे बोलतात

प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

फेकणे,मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते
पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येतो,ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते…
परंतु दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

***इमेल द्वारे पाठवलेली कविता.कवी - अनामिक