Party n funny jokes:: |
amchi mumbai kavita - marathi poem bombay Posted: 29 Jan 2013 02:20 AM PST मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय. ८ रूपयाला वडापाव आणि १० रुला चाय. आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय. आणायची ९० रु किलोची चिकन. सांगायच बोकडाच मिळतच नाय. अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय. मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय..!! सकाळी सकाळी ९ वाजता उठायच. बिना तोंड धुता खिडकित यायच.. शेजारच्या पोरीला शाळेत जाताना हळूच म्हणायच हाय... तीने रागात पाहिल तर म्हनायच सुंदर माझी ताय.. मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच राँग नंबर लागला की काय.. अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय..!! रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्ते बाइक वाल्यांची किर किर, फेरीवाल्यांची दादागिरी, सडलेली कोथिम्बिर, कच्च कुच्च वडापाव, आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन.. पर प्रान्तियानाच म्हनायच भाय.. अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय..!! पान्यासाठी पळायच , ग्याससाठी रांगा कामाला जान्या अगोदरच फैक्ट्री चा वाजतो भोंगा. धावत धावत टाकाव्या लागतात ट्रेन मधे ढेंगा. ट्रेन मधल्या गर्दित आपण असतो आतमधे आणि बाहेरच लटकतात पाय. दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..!! काही ही असुद्यात पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती तीच आमची ताय आणि तीच आमची माय.. आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय.. आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय..!! गरिबाच पोट आणि दुधावरली साय..!! |
You are subscribed to email updates from Party funny jokes To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |