Party n funny jokes:: |
निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी Posted: 14 Feb 2011 09:32 PM PST मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला ते बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो. कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते. पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात. कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते. अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो.... कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते. पुर्वी कोंबडा आरवायचा. कोंबडी झोपुन असायची. आजकाल मोबाईल आरवतो. |
निबंध :- माझा आवडता प्राणी : गाढव Posted: 14 Feb 2011 09:28 PM PST तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल जंगल आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही. कमल हसन च्या "हिदुस्थानी" नावाच्या सिनेमामध्ये खुप सरे झेब्रे दाखवले होते त्यामुळे सिनेमावाले झेब्रे पाळत असल्याची मला शक्यता वाटते.पण सलमान खान नावाचा नट हरणांच्या शिकारीबरोबरच झेब्र्याची सुध्धा शिकार करत असल्याची शक्यता असल्याने सध्या सिनेमात झेब्रे दाखवत नाहित. मला "किंगकॉग" नावाचा अस्वलाचा सिनेमा आवडतो. ईसापनितीमध्ये गाढवाच्या खुप गोष्टी आहेत. माझी आज्जी मला रोज झोपताना गोष्टी सांगते. पण ईसापनितीमध्ये गाढवाला नेहमीच बावळट म्हणुन दाखविले आहे, हे चुकिचे आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे गाढवाला पदार्थांची चव कळत नाही. पण मला गोड पदार्थांची चव खुप आवडते. माझे "बाबा" व "शाळेचे गुरूजी" पण मला नेहमी "गाढव आहेस" असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा माझी आई माझा खुप लाड करते, म्हणुन ती मला खुप आवडते. ती मला गोड्-गोड पदार्थ खायला देते. गाढवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते खुप लाथा मारते. "WWF" नावाच्या खेळात "BATISTA" नावाचा प्राणी सुध्धा खुप लाथा मारतो पण तो गाढव नसुन रेडा आहे. माझा दादा म्हणतो त्या खेळातिल सर्व काही खोटे असते त्यामुळे मला तोच गाढव असल्याची शंका येते. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने मला गाढवासारख्या लाथा मारल्या.पण मला "WWF" पहायला खुप आवडते. अजुन १ गोष्ट म्हणजे गाढव रात्री खुप जोरात "ढोंच्यु .... ढोंच्यु" असे ओरडत बसते त्यामुळे माझी झोप मोड होते. मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. त्यामुळे कधिकधी मला खुप रडु येते. माझे बाबा म्हणतात की "गाढवाच्या मागे व साहेबाच्या पुढे कधी उभे राहु नये" साहेब व गाढव यांच्यातिल संबंध मला काहि कळला नाही. कदाचित ते पण लाथा मारत असावेत. तसा माझा साहेब सुध्धा गाढवच आहे. म्हणुन मी त्यांच्या पुढे ऊभे न राहता शेजारी ऊभे राहतो. गाढव शक्यतो रस्त्यावर राहते. भारतात रस्त्यावर भिकारी पण राहतात. काहि दिवसांपुर्वी भिकार्यांवर "ट्राफिक सिग्नल " नावाचा सिनेमा आला होता. तो मला मुळीच आवडला नाही. खुप घाण सिनेमा होता. आपल्याकडे " आडला हरि गाढवाचे प्पय धरी " अशी १ म्हण आहे. पण तो पुढचे धरतो का मागचे ते मला माहित नाही. अजुन १ गोष्ट म्हणजे त्या म्हणीतिल "हरि" मी नसुन दुसरा कोनी तरी आहे. तो कोण आहे हे मला माहीत नाही. "गाढवीच्या" अशी एक शिवी सुध्धा आहे. मला अजुन खुप शिव्या येतात पण माझे बाबा मला शिव्या दिल्यावर मारतात. पण एकंदरित शिवीगाळ चांगली नव्हे त्यामुळे मार बसतो. माझी ताई सकाळी पाणी "गाळ" आहे असे ओरडत होती, मी तिला गाढव म्हणतो. |
You are subscribed to email updates from Party funny jokes To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |
0 comments:
Post a Comment